डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

0
208
  • शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी या
विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर – हवेली विधानसभा
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली
जुन्नर विधानसभा
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
६ मे – कात्रज
भोसरी विधानसभा
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव – शिरूर विधानसभा
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर
खेड – आळंदी विधानसभा
१० मे – चाकण बाजार समिती आवार
जुन्नर विधानसभा
११ मे – सांगता सभा राजुरी, ता. जुन्नर