पंतप्रधान मोदींची रेसकोर्सवर सभा ; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित सभा

0
160

पुणे, दि. २५ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रेसकोर्सवर सायंकाळी ७ वाजता होणार आहे. दरम्यान, त्याच दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा होणार आहेत.

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या माहितीनुसार, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त सभा होणार आहे. या सभेला संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्स मैदानावर सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील संयुक्त सभा संपन्न होणार आहे. अद्याप सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाही. परंतु याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिल रोजी पुण्यातील प्रचार शिगेला पोहोचणार आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.