पैसे न दिल्याने मित्राला बेदम मारहाण

0
317

पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून मित्राला बेदम मारहाण केली. ही घटना 12 मार्च रोजी तळेगाव स्टेशन येथे घडली.

आकाश संजय दाभाडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दिलीप भेगडे (वय 36), हरीश गरड (वय 35), प्रशांत प्रकाश गराडे (वय 32, सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाभाडे आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपी संतोष भेगडे याने आकाश यांच्याकडे पैसे मागितले. ते पैसे देण्यासाठी आकाश यांनी नकार दिला. त्याचा राग मनात धरून संतोष याने आकाश यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हरीश व प्रशांत यांनी आकाश यांना लाकडी दांडक्याने मारून फ्रक्चर केले. संतोष आणि प्रशांत यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.