पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुणे येथील लोकमान्य सोसायटीच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लौकगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ग्राहकसेवा व वितरण यंत्रणेतील लोकाभिमुख सुधारणांसाठी प्रशासन विभागातून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.