पोलिसांनी थांबवल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लंपास

PCB Admin
1 Min Read

आम्हाला इथे पोलिसांनी थांबवले आहे, अशी बतावणी करून दोघांनी एका महिलेने 69 हजारांचे दागिने काढून घेतले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी पावणे दहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर घडली.

याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तळेगाव-चाकण रस्त्याने चालत जात होत्या. दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आम्हाला इथे पोलीस साहेबांनी उभे केले आहे. तुम्हाला पुढे धोका आहे, असे सांगून दागिने कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. हातचलाखी करून महिलेचे 69 हजारांचे दागिने दोघांनी पळवून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article