पवार यांच्या थोरल्या भगिनी सरोज पाटील यांच्या विधानाने खळबळ

0
449
  • उद्या शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत आपली वाट महायुती सोबत पकडली. यामुळे पवार कुटुंबामध्ये देखील उभी फुट पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांना त्यांच्याच घरातून आता विरोध होत आहे. मात्र पवार कुटुंब अभेद्य असून भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.तसेच कावळ्याच्या शापाने गुरु मरत नसतो, असा टोलाही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्या आज कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होत्या.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत महायुतीमध्ये सामील झाले.यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असे ननंद भावजय असा हायव्होल्टेज सामना रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तर अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे कुटुंबात देखिल एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर आता शरद पवारांच्या बहिण आणि ज्येष्ठ नेते दिवंगत एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे.आमच्या कुटुंबात कोणतेही मतभेद नाहीत.आणि राज्याच्या राजकारणाची जाण असलेल्या शरद पवार मागे महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील.भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील असा विश्वास मला विश्वास आहे, असे सरोज पाटील म्हणाल्या.

तर कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघात श्रीमंत शाहू महाराज यांना उतरवत आहे त्यांचे तिकीट जवळपास निश्चित झाले असून केवळ औपचारिकता बाकी आहे.या संदर्भात देखील सरोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील लोक सुज्ञ आहेत.त्यांना कोणाला निवडून द्यायचं ते सांगावं लागत नाही. कोल्हापूरचे लोक शाहू महाराजांना निवडून देतील.यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही सूचना दिल्या असल्याचे सरोज पाटील म्हणाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची पुन्हा सत्ता नको असेल तर जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे अस आवाहन हे सरोज पाटील यांनी केलं.