पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मोशी, दि. १५ (पीसीबी) : पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केले. हा सारा प्रकार बुधवारी (दि.12) मोशी येथे घडला आहे.

यावरून धनंजय सुरेश जाधव (वय 33 रा. शिरूर,नांदेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी विश्वंभर व्यंकटराव दुधाडे (वय 34 रा.मोशी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीला आरोपी पती हा वारंवार मारहाण करत पैशांची मागणी केली. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article