‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा मुंबई, पुणेसह गुजराथमध्ये बाँम्बस्फोट घडविण्याचा कट

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. १५ (पीसीबी) : पुण्यात पकडलेल्या ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांना मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगात त्यांनी बाँम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

एनआयएने मुंबईतील विशेष न्यायालयात चार दहशतवाद्यांविरुद्ध तिसरे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले. मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहे. एनआयएने यापूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

Share This Article