आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूभट्टीवर कारवाई

0
195

खेड, दि. १४ (पीसीबी) – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारूभट्टीवर कारवाई केली. यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे करण्यात आली.

याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या घराच्या आडोशाला जमिनीमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी कारवाई करत दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये 40 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.