दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीचा खून

0
421

मोशी, दि. ११ (पीसीबी) – पत्नीने दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून तिचा खून केला. हे घटना रविवारी (दि. 10) मोशी येथे घडली.

जयश्री मारुती बाबना (वय 47, रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. मारुती बाबना (वय 50) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा बालाजी मारुती बाबना (वय 29) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती याला दारूचे व्यसन आहे. त्याने रविवारी पत्नी जयश्री यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र जयश्री यांनी पती मारुती याला दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून मारुती याने जयश्री यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यातच जयश्री यांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.