पुणे, दि. ४ मार्च – ओएलएक्स वरील फर्निचर विक्रीची जाहिरात पाहून ते खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 3 लाख 32 हजार 995 रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवारी (दि. 3) बावधन येथे घडली.
अरुण हनुमंत कुलकर्णी (वय 56, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9241217622 क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांनी त्यांच्या घरातील जुने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून 9241217622 क्रमांक धारकाने कुलकर्णी यांना संपर्क केला. फर्निचर विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांना वेळोवेळी स्कॅनर पाठवून त्यांच्या खात्यावरून 3 लाख 32 हजार 995 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












































