रिक्षा चालकाचा प्रवाशावर जीवघेणा हल्ला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

महाळुंगे, दि. २८(पीसीबी) रिक्षा चालकाने प्रवाशासोबत 20 रुपयांवरून भांडण करून मी इथला भाई आहे, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी साडे अकरा वाजता महाळुंगे येथे घडली.

रिक्षा चालक रोहन शहाजी गायकवाड (वय 23, रा. चाकण. मूळ रा. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती बँकेत कामाला जाण्यासाठी रिक्षातून जात होते. ते महाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरले. तिथे रिक्षाचे 20 रुपये सुट्टे न दिल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घातला. त्यानंतर मी इथला भाई आहे. तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article