पिंपरी, दि. २8 (पीसीबी) – मराठी भाषा दिनानिमित्त आज प्राधिकरण तसेच D.Y. पाटील कॉलेज परिसरामध्ये कार्यकर्ता नोंदणी अभियान आम आदमी पार्टी तर्फे सुरु करण्यात आले अशी माहिती शहराध्यक्ष सौ. मीनाताई जावळे ह्यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये अरविंद केजरीवाल जी यांच्या विषयी प्रचंड आकर्षण दिसून आले, युवा पिढी या बुरसुटलेल्या व घाणेरडे राजकारणाला कंटाळली आहे, सध्याच्या घडीला फक्त आम आदमी पार्टीच जनतेची, विद्यार्थ्यांची तसेच महिलां साठी चे विधायक कामे दिल्ली व पंजाब मध्ये पूर्ण करताना दिसत आहेत असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व तरुण विद्यार्थ्यांनी ह्यावेळी मांडली. शेकडो विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपची सदस्यता घेतली आणि पक्षाला पिंपरी चिंचवड मध्ये सत्तेमध्ये आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
ह्यावेळी शहराध्यक्ष मीनाताई जावळे, राज्य पदवीधर अध्यक्ष चेतन बेंद्रे, महिला अध्यक्ष सरोज कदम, स्वप्नील जेवळे, कमलेश रणवरे, ब्रह्मानंद जाधव, वैजनाथ शिरसाट, इम्रान खान, प्रशांत कोळवले, चंद्रमणी जावळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.










































