एक किलो गांजासह तरुणाला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी एक किलो गांजासह अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.26) चिंचवड येथील केएसबी चौकात पिंपरी पोलिसांनी केली आहे.

किशोर सुनील राक्षे (वय 28 रा. सिडको,नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हवालदार शांतारम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेकायदेशीररित्या 72 हजार 500 रुपये किंमतीचा 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा हा विक्रीसाठी घेवून आला होता. पिंपरी पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्या जवळील गांजा जप्त केला. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article