बेकायदेशीर रित्या मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. २७ (पीसीबी) – बेकायदेशीर रित्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी शनिवारी (दि.24) हिंजवडी फेज दोन येथे करण्यात आली आहे.

याप्रकरणी सचिन बिरा मेटकरी (वय 24 रा.हिंजवडी) याच्यवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार उमेश पुलग यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर रित्या कोणत्याही सुरक्षितते शिवाय बेदरकारपणे मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. यावेळी त्याने कोणतीही सुरक्षितता बाळगली नव्हती. यावरून आोपीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article