पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read
crime

वाकड, दि. २३ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कस्पटे वस्ती वाकड येथे करण्यात आली.

शुभम शंकर काची (वय 27, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसपटे चौक वाकड येथे एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती मिळाल्याने वाकड पोलिसांनी कारवाई करत शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article