मोशी खान परिसरात भर दिवसा दगडाने ठेचून तरुणाचा खून

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मोशी, दि. ५ (पीसीबी) – मोशी येथील नवीन खडी मशीन रोडवर एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 5) दुपारी घडली. भर दिवसा तरुणाला दगडाने ठेचून मारण्यात आले आहे. दरम्यान, या खुनामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास एका रिक्षातून चौघेजण नवीन खडी मशीन रोडवर आले. तिथे असलेल्या मोकळ्या जागेत रिक्षातील तिघांनी चौथ्या तरुणाला नेले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.

खून करून तिघेजण पळून गेले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने आरोपींना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे म्हटले जात आहे.

Share This Article