शिरगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाचा दारूभट्टीवर छापा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. ५ (पीसीबी) – अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरगाव येथे दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 4) दुपारी शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर करण्यात आली.

पोलीस अंमलदार अशोक गारगोटे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 19 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता अमली पदार्थ विरोधी पथकाने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पाच हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे साडेसात लाख रुपयांचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article