भिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

काळेवाडी, दि. १ (पीसीबी) – भिशी चे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तीन जणांनी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.29) रात्री काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महिला आरोपी, बजरंग शेंडगे (वय 42) व प्रशांत बजरंग शेंडगे (वय 25) सर्व रा. काळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी v त्यांच्या दोन बहिणी या त्यांच्या भिशी चे पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते.यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जिन्यावरून ढकलून दिले. यावेळी फिर्यदीचा हात पकडुन तुझ्यामुळे तुझा भाऊ मझ्या मुलीला सांभाळत नाही म्हणत हात पिरगाळाला. यात फिर्यादी यांना दुखापत ,आली. यावरून वाकड पोलिस्नी गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article