लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात,दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला

bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. १ (पीसीबी) – कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना लघुशंकेसाठी थांबणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. कारण या दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या डिकीत असलेले 5 लाख रुपये चोरांनी चोरून नेले आहेत. ही घटना 25 जानेवारी रोजी भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरात घडली.

या प्रकरणी बुधवारी (दि.31) योगेश पोपट लांडे (वय 32 रा भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अनोळखी चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंत्राटदार असून ते कामगारांचा पगार घेऊन त्यांच्या मोपेड वरून जात होते. यावेळी ते लघुशंकेसाठी थांबले असता चोरांनी त्यांच्या गाडी मधून तब्बल 5 लाख रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article