मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून वडिलावर चाकूने वार,उपचारा दरम्यान वडिलांचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

खेड, दि. १ (पीसीबी) – मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही चाकुने मारहाण करत गंभीर जखमी झाले होते. त्यांना पिंपरी तील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना खेड मधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि.28) दुपारी घडली.

याप्रकरणी मयत रमेश सुरेश भोसले (वय 55 रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी जखमी असताना चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून कृष्णा गणेश भोसले (रा. लांडेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रमेश फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने मारहाण केली होतीय या मारहाणीचे कारण विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकुने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. रमेश यांना त्वरित दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या वरून पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article