ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरची सव्वा चार लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपळे गुरव, दि. २२ (पीसीबी) – रिवॉर्ड पॉइंट जिंकल्याचे सांगत डॉक्टरची चार लाख 22 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपळे गुरव येथे 18 जानेवारी रोजी घडली.

डॉ. आनंद नामदेवराव यन्नावार (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस ॲक्सिस बँक रिवार्ड पॉईंट 9 हजार 850 रुपये जिंकल्याचा एक मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक देण्यात आली होती. इतर मेसेज बघताना नजरचुकीने फिर्यदिकडून लिंक ओपन झाली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यांमध्ये एकूण चार लाख 22 हजार 258 रुपये ट्रान्सफर झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article