आंघोळीला पाणी न दिल्याच्या कारणावरून पत्नीस बेदम मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) -पत्नीने अंघोळीसाठी पाणी न दिल्याच्या कारणावरून पती आणि दिराने बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी जखमी महिलेच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेश दशरथ तामचीकर (वय 28), आकाश दशरथ तामचीकर (वय 35, दोघे रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीने तिचा पती आरोपी जितेश याला आंघोळीसाठी पाणी दिले नाही. या कारणावरून पती जितेश आणि दिर आकाश या दोघांनी तिच्या पोटात, छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांची मुलगी गंभीर जखमी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article