संजय राऊत यांचा थेट मोदींवर प्रहार , देशात सध्या नवे शंकराचार्य तयार झालेत…

0
149

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : देशात सध्या नवे शंकराचार्य तयार झाले आहेत.. त्याचं नाव मोदी आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय. देशात बीजेपीपीठ नावाचं नवीन पीठ तयार झाल्याचा टोलाही राऊतांनी (Sanjay Raut) लगावलाय.. मोदी जे करतील तेच होतंय अशी टीकाही राऊतांनी मोदींवर केलीय. पंतप्रधान मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

हिंमत असेल तर स्वत: चा पक्ष काढा आणि चालवून दाखवावा असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आहे. दिल्लीच्या मदतीने पक्ष चोरायचे. राजकारणात पाकिटमारी करायची. हे कसलं राजकारण? ही तर नामर्दानगी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटंलय. तसंच शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेले आमदार पैशाच्या जोरावर पळवायचे. कोर्टबाजी करायची पक्षावर दावा सांगायचा. हे तुमचं तुम्हाला लखलाभ. पण आम्ही या विरोधात लढत राहू, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.

शिवसेना पक्षावर दरोडा कसा टाकण्यात आला. या मागचं सत्य काय? यावर आज उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे, अशी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत सराहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवावी, असं खुलं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.