अजित पवार भेकड… शरद पवार गटाचा आरोप जिव्हारी लागल्याने सुनिल तटकरे भडकले, म्हणाले…

0
284

कर्जत, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक घाडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पाठीमागे अनेक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ आमदारांपैकी ४३ आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला. यावेळी निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या युक्तीवादासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. या युक्तीवादात अजित पवार यांना भेकड म्हटले गेल्याचे सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय शिबिरात सांगितले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आले असता का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

२०१६ मध्ये मला आणि दादांना सांगण्यात आले आपणास सरकारमध्ये सहभागी व्हायाचे होते. त्यानंतर २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार आले असता. ५३ पैकी ४३ आमदार आहे. सर्व टीकेचा लक्ष दादा आहेत. मंत्र्यांना घेऊन भेटायला जायचे आहे. आपण भेटायला गेलो. महिनाभर आपण वाट पहिली. दादा तुमच्या प्रशासन कौशल्याबद्दल कोणीच काही बोलू शकत नाही. कालच्या युक्तीवादात काही भूमिका मांडण्यात आली. त्यात एक शब्दा कावड म्हणजे मराठी अर्थ तिखट आहे. कावड या शब्दांचा अर्थ भेकड आहे. अजित पवार जर भेकड असते तर कोणी हे सरकार तयार करण्याची हिंमत कोणी दाखवू शकले नसते. आता आपण कृतीतून दाखवून देऊ या की दादा यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक विश्वसार्हता असणारा नेता म्हणजे अजित पवार आहे. अजित पवार दिलेला प्रत्येक शब्द पाळतात. सामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वच स्तरावर अजित पवार शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात.