फ्रेंड्स ऑफ BJP च्या पिंपरी व चिंचवड विधानसभेच्या संयोजक पदी रवींद्र प्रभुणे व नंदू भोगले यांची नियुक्ती

0
206

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये संयोजक, सहसंयोजक तसेच 48 लोकसभा संयोजक यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधान सभा संयोजक पदी श्री नंदू उर्फ नितीन विश्वनाथ भोगले यांची तसेच चिंचवड विधानसभा संयोजक पदी श्री रवींद्र वामनराव प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय महिला आघाडीच्या प्रवक्त्या श्रीमती उषाताई वाजपेयी आणि मावळ लोकसभा संयोजक प्रमोदजी देशक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते ही नियुक्ती पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयात करण्यात आला.

2014 नंतर देशात असा मोठा जनसमुदाय तयार झाला ज्यांना कोणतीही राजकीय महत्वकांक्षा नाही पण पक्षाशी विचारधारा कार्यपद्धती व विकास निती आवडते अशा लोकांशी संपर्क ठेवणे आगामी काळात फायद्याचे राहील चालू घडामोडी एकादी घटना किंवा जनहित कारी योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा असा जनसमुदाय अग्रेसर राहू शकतो अशा समुदायाला जोडून घेण्याकरता “फ्रेंड्स ऑफ बीजेपी” हे अभियान राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केले आहे.

असे मावळ लोकसभाचे संयोजक श्री प्रमोद देशक यांनी नियुक्तीपत्र देताना आपल्या मनोगत मध्ये सांगीतले.
जिल्हा अध्यक्ष यांनी राष्ट्रीय प्रवक्त्या सौ उषा वाजपेयी यांचे स्वागत करून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा प्रमुख श्री काळुरामजी बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख श्री अमितजी गोरखे व इतर संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.