श्रमदानाच्या माध्यमातून राबविले स्वच्छता अभियान

0
303

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – ईद – ए – मिलाद आणि महात्मा गांधी जयंती या दोन्ही राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून पुणे जिल्हा समाज सेवा संघ या संस्थेच्या वतीने चिंचवडगावातील कब्रस्तान (स्मशानभूमी) येथे रविवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पुणे जिल्हा समाज सेवा संघाचे अध्यक्ष हाजी सलीम शिकलगार, कार्याध्यक्ष नाजिरभाई शिकलगार, सल्लागार दाऊदभाई शिकलगार, सदस्य अब्दुलरज्जाक शिकलगार, मिनाज शिकलगार, नियाज शिकलगार, आसिफ शिकलगार, अमीर शिकलगार, रफिक शिकलगार, संघाचे प्रवक्ते जमीर शिकलगार या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून कब्रस्तान परिसरातील वाढलेले गवत, निरुपयोगी वनस्पती काढून तसेच अन्य केरकचरा आणि प्लास्टिक यांचे वर्गीकरण करून सुमारे सहा पोती कचऱ्याचे संकलन केले. संकलित केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुपुर्द करण्यात आला.

विशेष बाब म्हणजे या स्वच्छता अभियानात अजलान मिनाज शिकलगार, जोरान अमीर शिकलगार, उजर फैयाज शिकलगार या लहान मुलांनी मोलाची साथ दिली. अभियानानंतर कब्रस्तान परिसर स्वच्छ आणि निर्मळ झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.