सोसायटीच्या पार्किंग मधून रिक्षा चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

तळवडे दि,११ (पीसीबी) – सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 7) पहाटे त्रिवेणीनगर तळवडे येथील अलंकार हाऊसिंग सोसायटी येथे उघडकीस आली.

सचिन लक्ष्मण भोसले (वय 34, रा. अलंकार हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14/जीसी 4228) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. बुधवारी रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची रिक्षा चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article