अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात, तुम्ही उशिरच केला

0
284

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) : अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी अजितदादांबाबत मोठे विधान केलं. “अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात, या ठिकाणी येण्यास तुम्ही उशिरच केला, असे शहा म्हणाले.
केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे झाले. त्यावेळी शहा बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. महिनाभरापूर्वी अजित पवार हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले, त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत अनेकवेळा अजितदादांची भेट झाली, पण सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते पहिल्यांदात रविवारी एकाच व्यासपीठावर होते.
शहा म्हणाले, “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही पहिल्यादांच एका व्यासपीठावर आहोत. मी अजितदादांना सांगू इच्छितो की हीच जागा आपल्यासाठी योग्य होती, पण बसण्यासाठी तुम्ही उशीर केला. दादा मोठ्या कालावधीनंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात,” शहा यांच्या विधानानंतर अजितदादांनी स्मित हास्य केलं .

“शहा यांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र दिला. सहकार क्षेत्रासाठी शहाचं नेतृत्व म्हणजे वरदान आहे, ” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“अमित शहा यांनी एकदा निर्णय घेतला की ते थांबत नाहीत. त्यांनी या क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल केले आहेत. सहकारमंत्री झाल्यानंतर शहा यांनी अनेक क्रांतीक्रारी निर्णय घेतले. त्यांच्यामुळे सहकार क्षेत्राला नवी उर्जा मिळाली आहे. ते देशहिताचा निर्णय घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी मी पाहिली नाही.शहांना मी कधीही थकलेले पाहिले नाही. ते नेहमीच उत्साही असतात. त्यांची भूमिका नेहमीच मदतीची असते,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
“सहकार क्षेत्रात हुकुमशाही प्रवृत्तीमुळे होते. शहा यांनी ही प्रवृत्ती मोडून काढली. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. राज्यातील साखर उद्योगाला केंद्राने मोठी मदत केली आहे. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. सहकार क्षेत्राचा कर माफ करून त्यांना या क्षेत्राला नवसंजीवनी दिली, ” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.