एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला अटक

0
490

भोसरी, दि. १७ जुलै (पीसीबी) – भोसरी येथील इंद्रायणी नगर मधील बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. हा प्रकार रविवारी (दि.16)पहाटे घडला.

एकनाथ त्रिंबक लंके (वय 48 रा.इंद्रायणी नगर,भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी पोलीस नाईक विश्वनाथ जाधव यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंके हा इंद्राणी नगर येथील कॅनडा बँक एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन चा दरवाजा लोखंडी रोडच्या सहाय्याने उचकटत होता. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन लंकेला रंगेहात अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल चोरीचा प्रयत्न केला जागून दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत