ठाकरे गटाच्याच नेत्याची सुषमा अंधारेंना मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार

0
297

पिंपरी, १९ (पीसीबी )- गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटामधील धुसफुस आपण पाहत आहोत. त्यातून ठाकरे गटातील अनेक नाराज नेत्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं देखील अनेकदा समोर आलं आहे. यामध्या नुकतचं ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाप्रमुखांनी ऐन पक्षाच्या बैठकीच्या तोंडावरच शिंदे गटाची वाट धरली.

त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील नाराजी आणि त्यातून घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. याबद्दल स्वतः जाधव यांनी कबुली दिली आहे. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागत असल्याचा धक्कादायक आरोपही केला आहे.

जाधव यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन कऱण्यात येत होत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.’

त्या माझ पदही विकायला लागल्या आहेत. मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वादात मी त्यांना दोन चापटा मारल्या. अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे.