शरद पवार यांच्या समोर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या, कारण…

0
220

सातारा, दि. ९ (पीसीबी) – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. शरद पवार आणि सुषमा अंधारे हे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी भाषणादरम्यान अंधारेंना अश्रू रोखता आले नाहीत.

शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. सध्या त्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

२ मे रोजी शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यामुळे ५ मे रोजी शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यानच्या काळात राज्यासह देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांशी संपर्क साधून निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनवणी केली.

सुषमा अंधारे यांनीही एक पत्र शरद पवारांना पाठवलं होतं. ते पत्र संजय राऊत यांनी पवारांना प्रिंट काढून वाचायला दिलं. तेच पत्र सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर वाचून दाखवलं. यावेळी मात्र अंधारेंना अश्रू आवरता आले नाहीत. रडतच त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं.

सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार यांनी सुषमा अंधारे यांची उपस्थिती होती. यावेळी अंधारेंनी पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र वाचून दाखवलं.