पुणेकरांनो सावधान ! पुढचे ३ दिवस कोसळणार धो-धो पाऊस; तर “या’ जिल्ह्यात अलर्ट जारी

0
207

पुणे, दि. १५ (पीसीबी) – हवामान खात्याकडून पुढील २ दिवस पुण्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

‘या’ भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.