उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपळे गुरव, दि.२९ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे सहकार नगर पिंपळे गुरव येथे घडली.

नादन मिनियम जेम्स (वय 47, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा मंगळवारी पहाटे उघडा होता. उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने फिर्यादी, त्यांची पत्नी आणि सासू यांचे 22 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article