मुंबई, दि. १६ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता कोर्ट काय निकाल देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि जगाचं लक्ष लागून राहणार आहे. कोर्टात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने आज लगचे निकाल जाहीर केलेला नाही. पण हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जो गोष्टीची उत्कंठा शिगेला लागली होती, ती गोष्ट आता लवकरच स्पष्ट होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता निकाल लागणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची खरी? कुणाची बाजू एकदम खरी? कोण खरं आणि कोण खोट्टं? कुणाच्या वकिलांनी अतिशय योग्य युक्तिवाद केला ते आता लवकरच स्पष्ट होणार आहे.