नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट

0
260

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या दृष्टीने होणारी वाहतुक कोंडीला रोखण्यासाठी गडकरींनी चार नव्या उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (११ मार्च) पुण्यात याबाबत घोषणा केली.

नाशिक फाटा ते खेड,तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवेघाट आणि वाघोली ते शिरुर या मार्गांवर नवे उन्नत मार्ग म्हणजेच फ्लाय ओव्हर बांधण्यात येणार आहे. या मार्गांसाठी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नुसार, नवले पूल आणि कात्रज देहूरोड बायपासवरील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-देहूरोडसाठी स्वतंत्र प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचं यावेळी गडकरी यांनी सांगितलं. नवले पूलावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, या परिसरात पर्यायी पूल बांधण्याचाही विचार करत असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं.

नाशिक फाटा ते खेड २९किलोमीटरसाठी आठ हजार कोटी रुपये, तळेगाव ते चाकण ५४ किमीसाठी ११ हजार कोटी, हडपसर ते दिवेघाट १२ किमी मार्गासाठी ८२३ कोटी आणि वाघोली ते शिरुर ५६ किमी मार्गासाठई १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. याशिवाय पुणे बंगळूर एक्सप्रेस वे २०६ किलोमीटर, पुणे-औरंगाबाद २६८ किलोमीटर अशी ६२५ किलोमीरटची ५३ हजार कोटी रुपयांची पुणे जिल्ह्यात कामे प्रस्तावित आहेत. ही जवळपास मंजूर झाली आहेत. यातील भूसंपादनाची कामेही सरु झाली असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं