वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी ताब्यात

bpcauthor bpcauthor
3 Min Read

पुणे, दि. ०८ (पीसीबी) – पुण्यातील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (वय २१) यास पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्यांनी रुपेशकडे ३० लाखांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.

मोरे यांचा मुलगा रुपेश याचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनविले आहे. त्यानंतर त्यास ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिली होती. या प्रकरणाची भारती विद्यापीठ पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तपास केल्यानंतर पोलिसांनी मुंबईतून एका मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञाताने मारण्याची धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा वसंत मोरेंचे चिरंजीव रुपेशला धमकी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी ३० लाखाची खंडणी मागणारा मेसेज पाठवला आहे. ३० लाख दे नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

रुपेश वसंत मोरे यांच्या व्हॉट्सअप मोबाईलवर अन्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाले आहे, असे ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले. तसेच ‘हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना, नही तो आपके उपर रेप के केस कर देंगे’ असा धमकीचा मेसेज केला.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला. त्यात ‘मै अल्फिया शेख, ३० लाख रुपये नहीं दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी’, अशा पद्धतीचा मेसेज पाठवला. काही दिवसानंतर पुन्हा रुपेशला ‘दे रहा है क्या पैसा नही, तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है, बहुत जल्द तेरे को गोली मार के जायेंगे, तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा धमकीचा मेसेज करून तीस लाख रुपयांची मागणी मेसेजद्वारे केला आहे.

‘सावध रहा रुपेश, अन्यथा…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. रुपेश हे वसंत मोरे यांच्यासोबत या रोजगार मेळाव्याला हजर होते. त्यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. यावेळी एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रुपेश हे परत गाडीवर आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रुपेश, अन्यथा असा धमकीवजा मजकुर लिहिलेला आढळला होता. हा प्रकार गंभीर असल्याने वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Share This Article