ठाकरे गटाची याचिका दाखल करुन घेण्यास सप्रीम कोर्टाचा नकार

0
329

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे ठरवले. आज त्यांनी याबाबत याचिका दाखल करण्यासाठी गेले असते याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असं त्यांनी सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटासमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्यामुळे आता ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला असून त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आज नव्हे तर उद्या या असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याने शिवसेनेचा मोठा हिरमोड झाला आहे.

निवडणूक आयोगाने काय निकाल दिला?
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. त्यानंतर आयोगाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी आयोगाने निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे
शिंदे गटाचे सर्व आमदार विधिमंडळत दाखल झाले आहेत, तसेच आता विधीमंडळातील शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयाचा ताबा शिंदे गटाला मिळाला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधीमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेत ही मागणी करणार असल्याची माहिती होती. त्यानंतर आता विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे गेला आहे.