एसएनडीटी विद्यापीठ अधीसभेवर आमदार उमा खापरे यांची नियुक्ती

0
446

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मुंबई येथील श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या अधीसभेवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या आमदार उमाताई खापरे यांची नियुक्ती करण्या आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 28/2/भ नुसार विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या आदेशानुसार सौ उमा गिरीष खापरे आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य, यांची दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथील श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून अधिकृत रित्या नियुक्ती करण्यात आली आहे.