लढा यूथ मूव्हमेंट च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न

0
308

पिंपरी दि २७ ,(पीसीबी) – भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा २०२३ लढा यूथ मूव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने गांधीनगर येथील सुमेध बुद्ध विहार याठिकाणी शहराध्यक्ष सुरेश बोचकुरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण आंबेडकरी आंदोलक विजय ओहोळ व समता सैनिक दलाच्या महिला शाखेच्या वतीने करण्यात आले.

सदर कार्यक्रमात लढा यूथ मूव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर म्हणाले की, “विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मतदानाचा अधिकार देऊन प्रजेच्या सत्तेची निर्मिती केली आणि त्यातूनच समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत स्वतंत्र पोहोचवले, मात्र सध्या शहरात प्रजासत्ताक उलटून एक वर्ष पूर्ण होत आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा एक वर्ष पूर्ण होत असतानाही जाहीर होत नाहीत जवळपास एक वर्ष प्रशासक राज्य आहे. त्यामूळे जर भविष्यात प्रजासत्ताक अबाधित राखायचे असेल तर संविधान विरोधी शक्तींवर मतदानातून बहिष्कार घालत संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असणार्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले पाहिजे”

विजय ओहोळ हे आपल्या भाषणात म्हणाले की,”शहरातील आंबेडकरी युवक हा कृती कार्यक्रमांना प्राधान्य देत आहे. केवळ भाषणबाजी न करता आंदोलनात्मक भूमिका घेत समाजहिताच्या प्रश्नांवर काम करत आहे.”

सदर कार्यक्रमात आंबेडकरी आंदोलक विजय ओहोळ, लढा यूथ मूव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, पत्रकार दीपक साबळे, अँड अतुल कांबळे, दशरथ ठाणांबीर,समाधान कांबळे, अतिश नागटिळक उपस्थित होते.गांधीनगर भागातील उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू यांचा गौरव करत त्यांना आवश्यक वस्तू भेट देऊन सन्मान करण्यात आला.संदीप गायकवाड,अक्षय जोगदंड, कैलास म्हेत्रे,विकी शिंदे, अमर गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.सूत्रसंचालन प्रविण कांबळे यांनी केले.