राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होणार, पदमुक्त, पंतप्रधानांकडे दिले पत्र

1 Min Read

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. परवा पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे.

Share This Article