भाऊ,आम्ही आपल्याला नेहमी विजेते म्हणून लक्षात ठेवू ,जो आयुष्यभर प्रजेसाठी जगला ….

0
275

पिंपळे सौदागर, दि. ९ (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोविंद गार्डनच्या बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी समस्त पिंपळे सौदागर रहाटणी रहिवासीयांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते .आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी ३ जानेवारी रोजी त्यांची दीर्घ आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपळे सौदागर रहाटणी परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली , मार्गदर्शनाखाली बरीच विकासकामे मार्गी लागली. या परिसराचा कायापालट करण्यात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच प्रभागात स्मार्ट सिटी प्रकल्प , उद्याने , मैदाने , रस्ते , साई चौक ग्रेड सेपरेटर इ.आणि यासारखे अनेक विकास कामे पूर्णत्वास आली असे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले मत व्यक्त करत आदरांजली वाहिली.

पिंपरी चिंचवड शहराचा विकास करणारे , शहराचे ज्वलंत प्रश्न मांडून त्यासाठी लढणारे कणखर नेतृत्व कायमस्वरूपी आपल्यामधून निघून गेले .दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या राजकीय जीवनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक , स्थायी समितीचे सभापती तसेच महापौर पदही भूषविले होते तसेच विधानपरिषदेचे सदस्यही राहिले आणि सध्या ते विधानसभेचे विद्यमान आमदार म्हणून अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या जाण्याने राजकारणातील कधीही न भरनारी अशी पोखळी निर्माण झाली आहे .

या शोकसभेत उपस्थित नागरिकांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींचा उजाळा दिला आणि यापुढे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे आपल्याला परत कधीही दिसणार नसले तरीपण कायम ते आपल्या आठवणीत व मनात राहतील.