माजी मंत्री सुरेश जैन त्यांची प्रकृती बिघडली, एअर एम्बुलन्सने ब्रिच कँन्डी मध्ये हालवले

0
262

जळगाव, दि. २४ (पीसीबी) : घरकूल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नुकताच नियमित जामीन मिळाला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जळगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, काल मध्यरात्री जैन त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईला उपचाराला हलविण्यात आले आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. काल (ता.२३)मध्यरात्री जैन यांना श्वास घेताना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण काही वेळाने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने एअर अ‌ॅम्ब्युलन्समधून ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले.

सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. घरकूल घोटाळाप्रकरणी जैन यांना शिक्षा झाली होती. काही दिवसापूर्वी त्यांना जामीन मिळाला आहे. ते कारागृहातून बाहेर आल्यावर जळगाव रेल्वे स्थानकापासून ते त्यांच्या गाडीपर्यंत रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात आले होते. जैन पुन्हा राजकारणाच एन्ट्री घेतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र, आपण राजकीय संन्सास घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.