आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना पतीसह सीबीआयने केली अटक

0
377

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.

सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली आहे. चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांच्यावर अनिमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

ईडीने फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकरणात खटला दाखल केला होता. चंदा कोचर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप आहे. आज या प्रकरणामध्ये सीबीआयने कारवाई केलीय.