शास्तीकर रद्द निर्णयाचे शिंदे गटाकडून पेढे वाटुन स्वागत

0
250

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) – बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष या युती सरकारच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जुलमी शास्ती कर रद्द करण्याचा अतिशय चांगला आणि लोकपयोगी निर्णय घेतला.

मागील अनेक वर्ष सातत्याने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप भोसरी विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने आज पिंपरी चिंचवड शहरातील शास्ती कर रद्द करण्यात आला निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्याचे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे नागरिकांना पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला व नागरिकांच्या वतीने तिन्ही प्रमुख नेत्यांचे व शासनाचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे बाळासाहेब वाल्हेकर, (शिवसेना जिल्हाप्रमुख) नीलेश तरस, (शिवसेना शहर प्रमुख), रवी ब्रम्हे, (शहर संघटक), सुरेश राक्षे, (चिंचवड विधानसभा प्रमुख),हेमचंद्र जावळे, (चिंचवड विधानसभा समन्वयक), निलेश हाके, (पिंपरी युवा सेना अधिकारी) , निखिल येवले, (पिंपरी विधानसभा संघटक) अविनाश जाधव, सिद्धेश्वर चौधरी, बाळकृष्ण चिले, किशन शेलार, राजेंद्र रंधावणे, दत्तात्रेय रसाळ, हनुमंत माळी, तुकाराम कांचन, सूर्यकांत ताम्हाणे, हरिनारायण ढोबळे, विठ्ठल वालकोली, नितीन कुऱ्हाडे, मुकुंद माने, मयूर तरस, लखन फुलवडे, पप्पू दांगट, व असंख्य शिवसैनिक.