केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत” स्वच्छता चॅम्पियन” म्हणून संगीता जोगदंड यांची आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित

0
373

पिंपरी ,दि.१५ (पीसीबी) -पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले सभागृहात महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार म्हणून गौरविण्यात आलेल्या सौ संगीता जोगदंड यांची सन 2023 अंतर्गत “स्वच्छता चॅम्पियन” म्हणून पालीकेचे आयुक्त शेखर सिंह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छतेच्या बाबतीत पिंपरी चिंचवड पालिकेचा देशात 19 वा क्रमांक तर नागरिकांचा सहभाग यासाठी देशात प्रथम क्रमांक आला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रत्येक क्षत्रिय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी ,यांनाही पालिकेने जबाबदारी यापूर्वी दिली आहे. यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयातील आधिकारी व इतरही कर्मचाऱ्यांना यांना प्रोत्साहन पर पारीतोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक क्षेत्रात, पर्यावरण विषयी, स्वच्छतेचे बाबतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील काही महिलांचा व पुरुषांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. सन 2023 या वर्षासाठी “स्वच्छता चॅम्पियन” म्हणून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा व महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार सौ संगीता जोगदंड यांना पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी त्या म्हणाल्या की आमच्या सासू आश्राबाई जोगदंड यांच्या बरोबर घेतल्याने आधिक आनंद झाला.

यावेळी ड,व ह प्रभागातील आरोग्य कर्मचारी यांची कार्यशाळा ही आयोजित केली होती. स्लाईडशो द्वारे, घन कचऱ्याची चार प्रकार कोणते आहेत याची माहिती दिली. स्वच्छ शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, ग्रहनिर्माण सोसायटी, पोस्टर पेंटिंग, ड्रॉईंग वॉल, शासकीय कार्यालय या क्षेत्रातही स्वच्छतेच्या बाबतीत कार्य करणाऱ्या संस्थांचा व व्यक्तीचा आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले की 15 डिसेंबर ते जानेवारी शेवटपर्यंत सर्वेक्षण चालणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा तर आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की देशात आपल्या शहराचा 19 वा क्रमांक आला आहे,तर इंदोर शहराच्या धरतीवर आपल्या शहराचा प्रथम क्रमांक येण्यासाठी नागरिकांनी ही आधीकाधीक सहभाग नोंदवला पाहिजे. स्वच्छ व सुंदर शहरासाठी स्वच्छता चॅम्पियन यांच्या बरोबरच सर्व नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून पालिकेला सहकार्य करावे,ही एकटया पालिकेची जबाबदारी नसून नागरिकांची पण जबाबदारी आहे असे शेखर सिंह यांनी म्हटले आहे.याच बरोबर मोठमोठ्या सोसायटयांनी आपल्या सोसायटीच्या कचऱ्याची विल्हेवाट आपणच लावावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ ,अण्णा बोदाडे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड , क्षत्रिय आधिकारी बी,बी कांबळे, तसेच आरोग्य अधिकारी दीपक कोटीयाना,पंडित कोठवडेकर ,सचिन जाधव आरोग्य निरीक्षक साबळे साहेब, सह आणि पालिकेचे अधिकारी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.