पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली सणानिमित्त स्वामी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला.
या स्वामी दीपोत्सवाला भाविक-भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी या दीपोत्सवाचे संयोजन केले होते. या प्रसंगी सुनील कदम, राजू गुणवंत, कैलासचंद्र सराफ, अर्चना तौंदकर, सारिका रिकामे, निलीमा भंगाळे, क्षमा काळे, शोभा नलगे, स्नेहा गुणवंत, प्रिती झोपे, सविता राणे, शलाका कोंडावार, मोहिनी शिराळकर आदी उपस्थित होते.