भारतीय टीम फायनलपर्यंत पोहोचणार नाही – शोएब अख्तर

0
258

लाहोर दि.२८(पीसीबी) – टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते आणि दिग्गज निराश झाले आहेत. झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या टीमने पाकिस्तानवर 1 रन्सने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय. पाकिस्तानी चाहते आणि त्यांच्या माजी क्रिकेटपटूंना हा पराभव पचवणं कठीण जातय. त्यांच्यातोंडून आता भारतासाठी शिव्याशाप निघत आहेत.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला झिम्बाब्वेकडून झालेला पराभव विशेष जिव्हारी लागलाय. या आठवड्यात पाकिस्तानची टीम मायदेशी परतत आहे. पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅग पॅक होईल, असं शोएबने म्हटलं आहे.शोएब अख्तर क्रिकेट विश्वात रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जायचा. “पाकिस्तानने जी टीम निवडलीय, त्यावरुन ते पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होतील” अशी शोएबने महिन्याभरापूर्वीच भविष्यवाणी केली होती. आता असं घडल्यानंतर भारतासोबतही असंच व्हाव, अशी शोएबची इच्छा आहे. भारतीय टीम फायनलपर्यंत पोहोचणार नाही, असं शोएब अख्तरने म्हटलय.

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेयर केलाय. त्याने पाकिस्तानी टीम मॅनेजमेंटवर आगपाखड केलीय. भारतावरही निशाणा साधला आहे. “पाकिस्तानची टीम या आठवड्यात मायदेशी परतेल. पुढच्या आठवड्यात भारत. सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन टीम इंडिया मायदेशी परतेल” असं शोएब अख्तरने म्हटलय.