उद्धव ठाकरे तुम्हाला कसली सहानभूती पाहिजे? -संदीप देशपांडे

0
210

मुंबई , दि. १६ (पीसीबी)- राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे – शिंदे गटातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. एकीकडे शिंदे गट, भाजप तर दूसरीकडे शिवसेना असा राजकीय संघर्ष राज्यातील जनता पाहत आहे. सत्ताधारी गटाकडून उद्धव ठाकरेंना चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होत असताना त्यात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील उडी घेतली आहे. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला कसली सहानभूती पाहिजे? असा सवाल देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

जय महाराष्ट्र तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती, ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार??कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? करोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची? महापौरांच्या मुलाला करोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे करोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे?

करोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्स नि बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? रेल्वे मध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे? करोनामध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजनच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे?पत्राचाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत त्याची सहानभूती पाहिजे? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानभूती पाहिजे की वाझे सारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत त्याची सहानभूती पाहिजे?

मा.बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय की स्वतःच्याच भावाचे अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानभूती हवीय?वरळीत केम छो वरळी चे बोर्ड लावलेत त्याची सहानभूती हवीय की चतुर्वेदी ना खासदार केलंत त्याची सहानभूती हवीय?

गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय ? की सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत त्याची सहानभूती हवीय उद्धव साहेब एकदा मराठी माणसाला समजून सांगाच तुम्हाला कसली सहानभूती पाहिजे????