पुणे, दि. ११ (पीसीबी) – पुण्यातील देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे जुगार खेळताना पकडल्यानंतर अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये नाना मोरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक आहे. त्यामुळे जगद्तगुरु संत तुकाराम महाराज यांच्या संस्थांवर यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.
आधीचे देहू संस्थानचे आधीचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळताना पकडलं होतं. त्यानंतर विशाल मोरेंना अटक झाल्यानंतर विशाल मोरेंचं संस्थानाकडून निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी नाना मोरे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा जुगार अड्डा सुरू होता. संत तुकाराम महाराज संस्थाचे आजी-माजी विश्वस्त तसेच देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीसह 26 जणांना तीन पत्ती जुगार खेळताना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यामुळे वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देहू संस्थानने विद्यमान विश्वस्त विशाल मोरे यांना संस्थेच्या पदावरुन निलंबित करण्यात आलं होतं.